निपुण भारत अंतर्गत,माता पालक मेळाव्यात आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव तनपुरा ग्रामपंचायतकडून विविध वस्तूंचे वाटप

कर्जत (प्रतिनिधी) : – वडगाव तनपुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये माता पालकांचा सक्रिय सहभाग कसा असावा, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि आहारामध्ये तृण धान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात आली.तसेच एक मूल एक झाड अंतर्गत श्री.निलेश तनपुरे यांनी उत्कृष्ट प्रतीची केशर आंब्याची रोपे विकत आणून मुलांना वाटप केली तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या रोपाची वाढ उत्कृष्ट होईल त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर अनुक्रमे 2100रू,1500रू, 1000रू आणि 500 रू अशी बक्षिसे देण्याचे जाहीर केले.
तसेच मा.आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पॅड ,पाण्याच्या बाटल्या आणि वह्या यांचे वाटप केले.या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने माता पालक तसेच सरपंच सौ.शुभांगीताई निलेश तनपुरे,SMC अध्यक्ष श्री.संदीप शेंडगे, निलेशदादा तनपुरे,स्वप्नील प्रताप तनपुरे ग्रा. प.सदस्य , ग्रामसेविका ढगे मॅडम आणि सामाजिक कार्यकर्ते श्री .राहुल नवले इ.उपस्थित होते.
श्री राहुल नवले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व सांगितले तसेच त्यांचे संगोपन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले .
शाळेतील सहशिक्षिका श्रीम.वर्षा भापकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि मुख्याध्यापिका श्रीम.सरला मोढवे यांनी उपस्थित मातांना मार्गदर्शन केले व शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले.