Advertisement
ब्रेकिंग

आमदार प्रा राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस कुस्ती स्पर्धा घेऊन साजरा ..

पै . अजित ( दादा ) शेळके मित्र मंडळ कोरेगाव यांचा उपक्रम ..

Samrudhakarjat
4 0 1 8 9 2

कर्जत (प्रतिनिधी) :- माननीय आमदार प्रा राम शिंदे साहेब यांचा वाढदिवस दि.01/01/2024 रोजी होता .यावेळी बोलताना आ.राम शिंदे यांनी सांगितले कि मतदार संघामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम सप्ताह असतो परंतु यावर्षी वाढदिवस पंधरवडा साजरा होत आहे . लोकांमध्ये उत्साह आहे, उत्स्फूर्ततेने हे कार्यक्रम केले जात आहेत . शेवटी लोकांना आपला तो आपलाच हे कळलेलं आहे . सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असते असे म्हणत त्यांनी शरीर संपदा जोपासण्याचा सल्ला तरुणांना दिला .. यावर्षी कर्जत जामखेड मतदार संघामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी हा वाढदिवस साजरा करणेत येत आहे .

             कोरेगाव ता कर्जत येथे पै . अजित दादा शेळके मित्र मंडळाच्या वतीने कोरेगाव येथे भव्य कुस्त्यांचे मैदान घेणेत आले होते . या ठिकाणी आजी माजी महाराष्ट्र केसरी पैलवान यांनी हजेरी लावली त्याप्रमाणे महाबली, हिंदकेसरी पै. श्री सतपाल सिंग यांची प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे आकर्षण ठरले . माझ्या वर महाराष्ट्राने खूप प्रेम केले आहे . महाराष्ट्रा मधून ऑल्मिपिक विजेता झालेला आहे . पुन्हा एकदा ऑल्मिपिक चे पदक भारताला मिळावे . मी मोफत प्रशिक्षणाची सोय केलेली आहे . त्याचा लाभ महाराष्ट्राने घ्यावा अशी विनंती त्यांनी आपल्या भाषणात केली . या ठिकाणी कुस्ती मैदानात खास आकर्षण शेवटची मानाची कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध सेनादल पैलवान राकेश कुमार यांच्यात पार पडली. यामध्ये पैलवान शिवराज राक्षे विजयी ठरला. या कुस्ती मैदानासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये पद्मभूषण, पद्मश्री , अर्जुन पारितोषिक विजेते ,द्रोणाचार्य पारीतोषिक विजेते,रुस्तम ए हिंद पारितोषिक विजेते,हिंदकेसरी पैलवान सतपाल सिंग दिल्ली, हिंदकेसरी अभिजीत कटके, ऑलम्पिक वीर डीवायएसपी राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर (नाना),महाराष्ट्र केसरी चंद्रास निमगिरे व इतर उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी त्यामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष श्री शेखर भाऊ खरमरे,जिल्हा बँकेचे संचालक श्री अंबादास उर्फ बप्पाजी पिसाळ, कृषि उत्पन्न बाजार समिती कर्जतचे सभापती श्री काकासाहेब तापकीर ,जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शरद भाऊ कार्ले, जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक खेडकर, पै श्री प्रविण घुले पाटील, कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य पै श्री काका धांडे, श्री सोमनाथ भाऊ पाचरणे

(सरचिटणीस भाजपा अ.नगर), उद्योजक महेश तनपुरे, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष श्री पप्पू धुमाळ, पै डॉ भिसे,यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते तर हजारोंच्या कुस्तीप्रेमी संख्येने उपस्थित होते . सर्वांचे स्वागत पैलवान युवराज बापू शेळके व पैलवान अजित दादा शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन श्री उदय सिंग परदेशी यांनी केले . मैदान संपल्यानंतर सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ..सर्व उपस्थित मान्यवरांचे व कुस्तीप्रेमींचे आभार निळकंठ शेळके यांनी मानले. .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker