कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुभाष माळवे तर उपाध्यक्षपदी मोतीराम शिंदे यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार विदर्भ सत्यजित चे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे यांची तर उपाध्यक्षपदी मोतीराम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. दिनांक 5 जानेवारी रोजी कर्जत तालुका पत्रकार संघाची बैठक संघाचे मावळते अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार गणेश जेवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन संघाच्या मागील वर्षाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच नवीन वर्षासाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. कर्जत तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली ती पुढील प्रमाणे:-अध्यक्ष- सुभाष माळवे, उपाध्यक्ष- मोतीराम शिंदे , सरचिटणीस – निलेश दिवटे, खजिनदार-मुन्ना पठाण, यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून – गणेश
जेवरे, यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी – मच्छिंद्र अनारसे, डॉ. अफरोज पठाण, दिलीप अनारसे, यांच्यासह तालुक्यातील ग्रामीण
पत्रकारांचा समावेश करण्यात आला असून कायदेशीर सल्लागार म्हणून अँड. दिपक भंडारी व अँड. सुमित पाटील यांची निवड करण्यात आली.
आगामी काळात कर्जत तालुका पत्रकार संघाच्या
माध्यमातून ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी
प्रयत्न करून काम केले जाईल. अशी भावना नूतन अध्यक्ष सुभाष माळवे यांनी यावेळी व्यक्त केली.