मा. राजेंद्र देशमुख यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बारामती येथे आज पक्षप्रवेश.

राशीन( प्रतिनिधी):- जावेद काझी .कर्जत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्या च्या राजकारणात गेल्या 75 वर्षापासून राजकीय पारंपारिक वलय व वारसा प्राप्त असणारे राशीन येथील राजेंद्र भैय्या देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात आज रविवार दि.२७. ऑक्टोबर२०२४. रोजी गोविंद बाग बारामती येथे सायंकाळी ६ .वाजता असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व चहात्यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती प्रमुख पदाधिकाऱ्याकडून मिळाली असून राजेंद्र भैय्या देशमुख यांच्या मते महाराष्ट्रधर्म,
संस्कृती विचार आचार वाचवण्यासाठी ८४. वर्षाच्या योद्धा ला साथ देऊया. कर्जत -जामखेड चा सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राच्या या उगवत्या शरदचंद्र पवार या अनुभवी नेतृत्वाला साथ देणे गरजेचे असल्यामुळे संधी साधू भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य युवक नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष शरद पवार(गटाला) तसेच शरद पवार साहेब या ८४. वर्षाच्या योद्धाला वेळ पाहून साथ देण्याची नित्यान्त गरज असल्यामुळे व भावी काळात कर्जत जामखेड तालुक्याची विकास धारा मजबूत करण्यासाठी आपण आज तुतारी सोबत जाण्याचा निर्णय मागील काही दिवसापूर्वी राजेंद्र देशमुख यांनी पदाधिकारी कार्यकर्ते व चहात्यांसोबत चर्चा संवाद करून घेतला असून आज सायंकाळी ६ वा अधिकृतरित्या पक्षप्रवेश या शरदचंद्र पवार साहेब व मा.आ. रोहित पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गोविंदबाग बारामती येथे होणार आहे.