राशिन ग्रामपंचायतीने चिखलमय रस्त्यांबाबत ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत पाहु नये :- शाहू राजे भोसले.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन व परिसरात सौम्य स्वरूपाचा पाऊस नुकताच सुरू झाला असून तुरळक भुरभुर स्वरूपाच्या पावसाने राशिन मुख्य बाजारपेठ, वेशीपासून जुना कुंभारगाव रस्ता राजे शॉपिंग सेंटर पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कैकाडी गल्ली, इतर रस्त्ये पावसाच्या पाण्याने चिखलमय झालेले असून या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर वाहतुकीत तसेच शालेय विद्यार्थ्यांना व इतर नागरिकांना जीव धोक्यात घालून चिखलय रस्त्यातून रोज वाट काढावी लागत आहे.
जागोजागी झालेल्या चिखलमय खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा सांगून देखील ग्रामपंचायत मार्फत याबाबत कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले जात नाही किंबहुना तात्पुती मुरमाची मलमपट्टी होते परंतु नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती बघावयास मिळते या अनुषंगाने ग्रामपंचायत तात्काळ पाऊले उचलीत सिमेंट काँक्रीट, पेव्हर ब्लॉक टाकून रस्त्याचे काम मजबूत करावे . तसेच राशीन ग्रामपंचायतने चिखलमय खराब रस्त्या बाबत ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.