पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत राशीनच्या इंदुबाई सपाटे यांना दाेन लाखाचा चेक युनियन बँकेकडून सुपृत केला.

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन नजीक राजेभाेसले वस्तीवरील रामदास श्रीरंग सपाटे यांचा ५/१/२०२३. राेजी अपघाती मृत्यू झाला होता. या अनुषंगाने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंतर्गत यांची पत्नी इंदुबाई रामदास सपाटे यांना २ लाख रुपयाचा चेक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा राशीन चे शाखा अधिकारी बापूराव सुपेकर यांच्या हस्ते देण्यात आला. अभिजीत काकडे साहेब, ज्ञानेश्वर थोरात साहेब, विशाल मुढे साहेब, विलास गुंड साहेब, सागर सुळ, कमलदेव सपाटे, साळवे व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळेस अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची माहिती देण्यात आली. या योजनेचे ध्येय हा आकडा वाढवयाचे आहे,.
वय पात्रता १८ ते ७० वयाेगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाभार्थीचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. हप्ता योजनेसाठी वार्षिक १२+(सेवाकर) हप्ता असून ताे दरवर्षी लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल. त्यासाठी आर्थिक वर्ष १जुन ते ३ मे असेल. तसेच
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना(pmjjby) ही एक परवडणारी मुदत विमा योजना आहे. या अंतर्गत 330 रुपयाच्या प्रीमियमवर
दरवर्षी २ लाख रुपयाचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. पॉलिसी धारकांचा मृत्यू झाल्यास रक्कम त्याच्या नातेवाईकांना किंवा
नाँमिनीला दिले जाते. एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक आयुर्विमा योजना आहे. याचा लाभ १८ ते ५० वयोगटातील नागरिक घेऊ शकतात.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यूनंतर हा क्लेम दिला जातो. तर
पंतप्रधान जीवन ज्योती विमा नैसर्गिक मृत्यू साठी वार्षिक रुपये ४३६ रुपये भरावे लागतात या दोन्ही योजना केंद्र सरकारच्या आहेत. या दोन्ही विमा योजनेच्या माहितीसाठी नजीकच्या बँकेत जाऊन अधिक माहिती सविस्तर घेऊ शकता. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक आधार मिळू शकेल सर्व बँक खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा .असे मनोगत यावेळी शाखा अधिकारी बापूराव सुपेकर यांनी व्यक्त केले.