नगरपंचायत लेखापाल नयना कुंभार यांच्यावर अब्रू नुसकानीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक नामदेव चंद्रकांत राऊत यांच्यावर नगरपंचायतच्या लेखापाल नयना कुंभार यांनी शासकिय कामात अडथळा, विनयभंग व इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल केलेला आहे. यातील आरोप व गुन्हे खोटे असून ते मागे घेण्यात यावेत तसेच नयना कुंभार यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महासंग्राम युवा मंचच्या वतीने कर्जतच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बुधवार, दि. ३१ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयामध्ये नगरसेवक नामदेव चंद्रकांत राउत यांच्यावर नगरपंचायत कर्मचारी लेखापाल नयना कुंभार यांनी शासकिय कामात अडथळा व विनयभंग असे खोटे आरोप व गुन्हे दाखल केलेले आहे. नयना कुंभार यांना निलंबित करण्यात यावे व नामदेव राउत यांच्यावरील दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व नयना कुंभार यांच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर हे गुन्हे मागे घेण्यात आले नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर रोहन कदम, सतिश समुद्र, संपत नेवसे, योगेश नेवसे, महादेव खंदारे, प्रभाकर पवार, भूषण ढेरे, छगन येवले, संभाजी जाधव, शरद मेहेत्रे, निलेश शिंदे, अजय भैलुमे आदींच्या सह्या आहेत.