कर्जत तालुक्यात पावसाचा थैमान शेती पिकाचे मोठे नुकसान, पंचनामा करण्याची मागणी : मा.सभापती मनिषा जाधव

कर्जत (प्रतिनिधी) :- मागील दोन दिवसांपासून कर्जत शहरासह तालुक्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यात कांदा व मका या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे तब्बल कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यावर संकट कोसळले असून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पावसामुळे शेतात शेत जमीनीचा सुपीक थर पाण्यासोबत वाहून गेला आहे.
खरडून गेलेल्या शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे आधी च पिकाचे नुकसान झाले आहे त्यातच जमीन खरडून गेल्याने दीर्घकाळासाठी याचा परिणाम होणार असल्याने शासनाने नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मा.सभापती मनीषा दिलीप जाधव यांनी केली आहे.