आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
कर्जत शहरात आणि परिसरात तुफान पाऊस ;आठवडे बाजारात विक्रेत्यांसह पावसाने केले बेहाल

Samrudhakarjat
4
0
1
9
4
3
(समृध्द कर्जत प्रतिनिधी) कर्जत :- कर्जत शहरात आणि परिसरात तब्बल दोन तास तुफान पाऊस बरसत सुरू होता मुख्य रस्त्यास तलावाचे स्वरूप आले होते. शहराच्या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह पावसाने बेहाल होत त्रेधातिरपीट उडाली. जवळपास सर्वच भागांत चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. पाण्यातून वाट काढताना अनेकांचे हाल झाले.
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास कर्जत शहर आणि परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली. पावसाने रौद्ररूप धारण करीत अक्षरशः नगर-बारामती मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आणले.
कर्जतचा सखल भागात तर गुडघाभर पाणी साचले होते. त्यात कर्जत शहरात अनेक दुकाने पाण्याखाली जात विक्रीसाठी आणलेला शेतमाल पाण्याच्या लोंढ्याने वाहन जाताना आणि तसेच विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढताना अनेकांचे हाल झाले.