यमाई देवीच्या पालखी दर्शनासाठी राशिन नगरी सज्ज!भावीक भक्तांची यात्रे दरम्यान अलोट गर्दी.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी नवरात्र यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून पालखी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त यमाई मातेच्या पालखी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत पालखीमध्ये विराजमान असलेला जगदंबा देवीच़े मुखदर्शन घेण्यासाठी राशीन मध्ये गल्ली गल्ली पालखी मार्गस्थ रस्त्यावर, विराजमान स्थळावर, यमाई मातेचे मुख दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झालेली दिसून येत आहे. या जगदंबा देवी पालखी यात्रा सोहळ्यानिमित्ताने, दर्शनासाठीआलेल्या भाविक भक्तांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करीत गुलाल, खोबरे,
उधळीत आनंदोत्सव साजरा केला. यात्रेदरम्यान राशिन गावची बाजारपेठ फुलली असून, मौत का कुवा, पाळणे, साप शिडी, जम्पसेट, विविध प्रकारच्या मिठायांचे दुकाने, बच्चे कंपनीसाठी खाऊ गल्ली दुकाने,सौंदर्य प्रसाधनाचे दुकाने, खेळणी दुकाने, मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत असून, बच्चे कंपनी, युवती ,महिलावर्ग, युवक व इतर नागरिकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. चालू वर्षी जवळपास ३० वर्षानंतर अगदी वेळोवेळी पाऊस पडल्यामुळे, उडीद, सोयाबीन, मका व इतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येण्यास निसर्गाने साथ दिलेली असल्यामुळे शेतकरी वर्ग उत्साहीत झाला असून यात्रे दरम्यान कुटुंबातील सदस्यांना व बाल बच्चे कंपनीसाठी खर्च करून आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहे. तसेच अगदी वेळेवर नवरात्री दरम्यान मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या खात्यावर प्रत्येकी साडेसात हजार रुपये जमा झाले असल्यामुळे महिला वर्ग
आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला दिसत असून त्यांचा आनंद दुगुनीत झाल्याचे दिसून येत असून प्रत्येक कुटुंबात आर्थिक दृष्ट्या बाबत आनंदाचा पारा चढताना दिसत आहे. या विशेष कारणांमुळे जगदंबा देवी पालखी उत्सव सोहळा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे. मात्र सर्वसामान्य भावीक भक्तांच्या मते नवरात्री उत्सव दरम्यान व पालखी सोहळा यात्रा दरम्यान मंदिर परिसरात होणाऱ्या चोरींच्या, सुरक्षेच्या, वाहतूक कोंडीच्या, दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट चोख बंदोबस्त पहावयास मिळाला नाही.