कर्जत येथील श्री नागेश्वर मंदीर भक्ती शक्ती ध्वज आणि पेव्हीग ब्लॉकचा लोकार्पण सोहळा.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते भक्ती शक्ती ध्वज आणि पेविंग ब्लॉकचा कामाचा लोकार्पण सोहळा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत परिसरातील सर्व नागेश्वर भक्तांना कळविव्यास आनंद वाटतो की, विद्यमान आमदार मा. रोहित पवार यांच्या स्वखर्चातून, 100 फुट उंचीचा भगवा ध्वजाचे ध्वजारोहन व पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण सोहळा सोमवार दि. 14/10/2024 रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व कर्जत व कर्जत परिसरातील शिवभक्तांनी उपस्थित रहावे.
कैलासवाशी शिवभक्त पोपटलाल सुंवरलाल बलदोटा यांनी कर्जत तालुक्यातील पहिला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी गावकऱ्यांच्या सहकायातुन इ.स. १९७२ साली सुरु केला. त्याबरोबरच मंदिर व मंदिर परिसराचा जिनोध्दार हळूहळू गावकऱ्याच्या सहकायाने व स्वखर्चाने केला. ते स्वतः कलाकार असल्याने मंदिरा वरील कमळ व नागाचे शिल्प स्वतः केले आहे. धर्मदाय खात्यामार्फत मंदिर हे सार्वजनिक करुण चेतले आहे. या सोबतच वर्षभरात अखंड हरिनाम सप्ताह, त्रिपुरा पोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा पंढरपुरकडे जाणाऱ्या अनेक
दिव्यांना जेवण अनेक वर्ष याबरोबर गुढीपाडव्याला आढ्यांचा कार्यक्रम, शेतकरी मेळावे, विविध रोगनिदान शिबीर, असे अनेक कार्यक्रम त्यांच्या काळात राबविले.
त्यांच्यानंतर त्यांचे चि. डॉ. उदयकुमार बलदोटा है येथील व्यवस्था पाहत आहेत. शिवभक्त कैलासवासी पोपटशेठ बलदोटा यांचे मंदिर परिसर विकास व पेव्हिंग ब्लॉक बसविणे हे स्वप्न होते. ते विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या मार्फत १४/१०/२०२४ रोजी पूर्ण होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लोक वर्गणीतून दगडी पायऱ्यांचे काम ही सुरु आहे.
त्यासाठी यथाशक्ती मदन करावी व या कार्यक्रमास सर्व शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आव्हान. डॉ. उदय बलदोटा, अरुण थोरात, संतोष शिंदे, आशिष शेटे, शिवाजी क्षिरसागर, तात्या क्षिरसागर, नितीन क्षिरसागर दत्ता कटके, परशुराम अनारसे आदी नागेश्वर भक्त मंडळामार्फत करण्यात येत आहे