कोरेगाव मध्ये आ. प्रा. राम शिंदे व कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये रविवार, दि. ७ जानेवारी रोजी श्री कोरेश्वर मंदिर प्रांगणात आ. प्रा. राम शिंदे व कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त पै. अजित शेळके मित्र मंडळातर्फे भव्य निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम कुस्ती पै. शिवराज राक्षे विरुद्ध पै. राकेश कुमार, द्वितीय पै. तानाजी झुंजुरके विरुद्ध पै. संतोष जगताप, तृतीय पै सुनील फरतडे विरुद्ध पै. संग्राम पाटील आणि चतुर्थ कुस्ती पै. हनुमंत पुरी विरुद्ध पै. बाळू बोडखे यांच्यात होणार आहे. या कुस्ती मैदानासाठी पद्मविभूषण पैलवान सतपाल दिल्ली व हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके उपस्थित राहणार आहेत.
कुस्तीप्रेमींनी या कुस्ती मैदानाला उपस्थित राहावे. मैदान संपल्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे अशी माहिती मंडळाचे प्रमुख पैलवान किरण नलवडे यांनी दिली.