मा.खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी सात लाखाचा निधी.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील माजी..खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या वतीने सुशोभीकरणासाठी विशेष निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पेविग ब्लॉक बसवल्यामुळे हा परिसर सुंदर सुशोभित दिसत आहे .या कामासाठी माननीय जिल्हा बँक संचालक श्री अंबादास पिसाळ यांचे विशेष श्रेय लाभले.
तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार सदरचे काम मंजूर करण्यात आले असून.सदर कामासाठी सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या निधीतून सात लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. पेवर ब्लॉक बसण्याचे काम पूर्ण झाले असून सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे भाजपा पदाधिकाऱी व कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या भरीव निधी उपलब्ध करून दिल्या बाबत आभार व्यक्त होत आहे.