आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑर्केस्ट्रा ‘धुमाकळू’ उत्साहात संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरातील प्रभाग क्रं ८ मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर,शिक्षक कॉलनी याठिकाणी श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान नियोजन समिती नवरात्रोत्सव यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ऑर्केस्ट्रा ‘धुमाकूळ’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमात प्रस्तावना करताना प्रभागाचे नगरसेवक तसेच अमरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब तोरडमल यांनी श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान नवरात्रोत्सव नियोजन समितीच्या व आपले लाडके आमदार रोहित पवार यांच्या वतीने आलेल्या सर्वाचे स्वागत केले. गेल्या सात वर्षापासून आपण या
ठिकाणी नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम
वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून करत असतो आणि त्याला प्रभागातील सर्वांचा भरघोस प्रतिसाद असतो
या निमित्ताने प्रभागातील सर्व नागरिक एकत्र यावेत मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. एकत्रितपणे सण उत्सव साजरे व्हावेत. संपूर्ण प्रभाग कुटुंबासारखा रहावा हाच माझा एकमेव या प्रभागाचा नगरसेवक म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचा उद्देश आहे.
त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अनेक वेगवेगळ्या माध्यमातून आमदारांचे आपल्या सर्वांनाच नेहमी सहकार्य असते मदत असते मार्गदर्शन असते त्यामध्ये आरोग्य, शिक्षण, कृषी,महिला सबलीकरण असे सर्वच क्षेत्रात त्यांचे काम चालू आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रभागाच्या वतीने तसेच कार्यक्रमास आलेल्या सर्वांच्या वतीने रोहित दादांना शुभेच्छा दिल्या यावेळी कर्जत शहरासह तालुक्यात काम करणारी सर्व सामाजिक संघटनेचे चतुर्थ वर्षपूर्ती व पाचव्या वर्षात पदार्पण केलेल्या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचा
श्री संत अमरसिंह विद्या प्रतिष्ठान नवरात्रोत्सव नियोजन समितीच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ऑर्केस्ट्रा धुमाकूळ या कार्यक्रमात आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीने यांच्या मावशी सविताताई
व्होरा सामाजिक कार्यकर्त्या यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींच्या हस्ते रोहित दादांच्या वाढदिवसाचा केक कापून व्होरा ताईनी सर्वांचे वतीने दादांना शुभेच्छा दिल्या. प्रभागासह शहरातील सर्व मान्यवरांच्या तसेच नागरीकांच्या उपस्थितीत भव्य ऑर्केस्ट्रा धुमाकूळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवरात्रोत्सव नियोजन समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी कष्ट घेतले.