राजेंद्र देशमुख मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांना फळ व पाणी वाटप

जावेद काझी राशीन (प्रतिनिधी) : – महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री जगदंबा देवी नवरात्र उत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील राशीन येथील युवक नेते राजेंद्र देशमुख मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले.
गुरुवारी पाचवी माळ ललित पंचमी असल्याने सुवासिनी सौभाग्याचे लेणे मागण्यासाठी महिलांनी पहाटे अडीच पासूनच श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये गर्दी केली होती. जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राजेंद्र देशमुख मित्रमंडळाच्या वतीने फळांचे व पाण्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवक नेते राजेंद्र देशमुख, बापूसाहेब देशमुख सेवा सोसायटीचे संचालक विशाल राऊत, उद्योजक कैलास राऊत, प्रसाद सोनवणे, किशोर काळे, नितीन जाधव, प्रा. किशोर कांबळे,
निलेश गायकवाड, विजय काळे, अविनाश अवचर, प्रदिप सायकर , बाबासाहेब सायकर यांच्यासह राजेंद्र देशमुख मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.