कर्जत येथील माय मुहूर्ताब देवीची महाआरती आमदार राम शिंदे यांच्या हस्ते

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत शहरांतील प्रसिद्ध माय मुहूर्ताब देवीची महाआरती पाचव्या माळे निमित्त आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कर्जत शहरातील कापरेवाडी वेशी जवळ असलेल्या प्रसिद्ध माय मुहूर्ताब देवीची पाचव्या माळेला मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो यावेळीच पंचक्रोशीतील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात सालाबाद प्रमाणे या पाचव्या माळ्याच्या दिवशी देवीची पालखी काठ्या
तुळजापूरच्या दिशेने प्रस्थान करतात यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते तसेच यामध्ये आराधी गोंधळी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या देवीच्या प्रस्थान वेळी विधान परिषद आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते सोमवार ७/१०/२०२४ दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महिला युती आघाडीच्या कर्जत शहराध्यक्षा सौ आरती सोमनाथ थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारातून केली आहे तरी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व सर्व महिला पदाधिकारी यांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान थोरात यांनी केली आहे