शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांचा राशीन येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी शिवसेना अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख व कडवट शिवसैनिक बाबू शेठजी टायरवाले व माजी सेल टॅक्स ऑफिसर मुंबई नागेश जाधव साहेब हे काही कार्यक्रम निमित्त जात असताना त्यांनी युवक नेते साहिल दादा काझी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या एस के कंन्सट्रक्शन या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना कर्जत तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके मेजर, युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे, प्रहारचे देशमुख,भीम आर्मीचे दादासाहेब सोनवणे,राजेंद्र निंबाळकर दिघी,जालिंदर आरडे व महेश म्हेत्रे निमगाव,अजित बाबर पिंपळवाडी,बाबू शेठ चे सारथी पवन कुमटकर हे उपस्थित होते.
यावेळी बाबुशेठ टायरवाले व नागेश जाधव साहेब यांचा राशीन मुस्लिम समाजाच्या वतीने सन्मान युवक नेते साहिल दादा काझी व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सोहेल काझी व सर्व उपस्थित युवक बांधव यांच्या वतीने भरजरी फेटा बांधून सन्मान करण्यात आला, यावेळी इक्बाल शेख,सद्दाम काझी,रियाज शेख,वसीम काझी,तौसिफ शेख,इस्रायल काझी, रिहान बेग, साहिल काझी , मुजाहिद काझी, मंगेश बेरड, आयान जाहागीरदार, तय्यब काझी,नवेद काझी, यासीन काझी, आदिल खान, मस्तकीम जाहागीदार , सुफियान काझी, हुजेब शेख , अलसबुर काझी , मस्तकीम शेख, मुस्तफा शेख, अबरार शेख, जैद शेख, आयुब शेख, अब्दुल सत्तार जाहागीरदार , ताहेर काझी, अमजद काझी,राशीन शहर परिसरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीदरम्यान बाबुशेठ यांनी त्यांची राजकीय सुरुवात जिल्ह्यातील राजकारण व राशीन शहराशी त्यांची असलेली नाळ व अनेक वर्षापासून राशीन कर्जत मधील ते येत असलेल्या अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला व जुने राजकारण व सध्याचे राजकारण याच्यातील तफावत व सध्या राजकारणात कशा पद्धतीने कार्य करायचे याचे योग्य मार्गदर्शन केले .यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुती सरकार करत असलेल्या कार्याची व अल्पसंख्याक समाजासाठीच्या विविध योजनांची देखील माहिती दिली त्यानंतर उपस्थित सर्व युवक बांधव यांच्याबरोबर फोटोसेशन करून वैयक्तिक संवाद साधत पुढील कार्यक्रमास जाण्यासाठी परवानगी घेऊन रजा घेतली, आभार इक्बाल शेख यांनी मानले,.