जगदंबा विद्यालय राशीन व इतर विविध ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बनवा अन्यथा तीव्र आंदोलन करू :- पै. शामभाऊ कानगुडे.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- बारामती अमरापुर राज्य मार्गाचे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीलाही वेग आला असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात सध्या वाहतूक होताना दिसत आहे यामुळे अपघाताच्या प्रमाणात बारामती अमरापुर राज्य मार्गावर खेड ते राशीन पर्यंत रोज वाढ झालेली दिसून येत आहे. या अनुषंगाने याच रस्त्यावर रयत शिक्षण संस्थचे श्री जगदंबा विद्यालय आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोज त्याच रस्त्यावरून शाळेत येणे जाणे करावे लागत आहे. सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना शाळा सुटताना व भरताना जीव धोक्यात घालून मोठी दिनक्रमी मोठी कसरत करावी लागत आहे.
हे बघता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक असणे गरजेचे झाले आहे. तसेच राशिन मधील भिगवन चौक, युनियन बँक, जोशी पेट्रोल पंप, मातंग वस्ती, महात्मा ज्योतिबा फुले चौक, या प्रमुख क्रॉसिंग वाहतूक असलेल्या अपघाती ठिकाणी गतिरोधक बसवून गतिरोधकला पांढरा कलर देऊन रोडच्या साईटला पुढे गतिरोधक आहे असा फलक असणे बंधनकारक आहे. तसेच इतर वळणाच्या व धोक्याच्या ठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे, त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी होऊन वारंवार होणाऱ्या अपघातास आळा बसू शकतो असा विश्वास मा. सभापती श्याम कानगुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आधिकार्याकडे समक्ष बोलून वर्तविला आहे.
तरी वरील दिलेल्या प्रमुख वाहतुकीच्या क्रॉसिंग ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बनवावेत अन्यथा राशीन येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा शब्दरूपी कडवट इशारा श्याम कानगुडे यांनी संबंधित विभागाला दिला आहे.