दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्णपदके पटकावली

कर्जत (प्रतिनिधी)कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाचे खेळाडूंनी अंमळनेर जि. जळगांव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेमध्ये १४ सुवर्ण, ४ सिल्व्हर, व २ ब्रॉन्झ पदके पटकावली आहेत. डेहराडून येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेकरिता पदक विजेत्या स्पर्धकांची निवड झालेली आहे. सदर खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले
सुवर्णपदके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा बर्डे, १ सुवर्ण, १ सिल्व्हर (५६ किलो वजनी गट), ऋतिका बर्डे, २ सुवर्ण (५० किलो वजनी गट), प्रतीक्षा कोरे, १ सुवर्ण, १ सिल्व्हर (४५ किलो वजनी गट), संग्राम शिंदे, १ सुवर्ण (५० किलो वजनी गट), ओंकार चौगुले, १ सुवर्ण (५५ किलो वजनी गट), प्रतीक सुद्रिक, १ सुवर्ण, १ ब्रॉन्झ (५९ किलो वजनी गट), भाग्यश्री धनवडे, २ सुवर्ण (५० किलो वजनी गट), निकिता लोंढे, २ सुवर्ण (५५ किलो वजनी गट), रिद्धी शेटे, १ सुवर्ण, १ सिल्व्हर (५६ किलो वजनी गट), प्राची सुद्रिक, १ सुवर्ण, १ ब्रॉन्झ (६३ किलो वजनी गट), ऐश्वर्या दळवी, १ सुवर्ण, १ सिल्व्हर (४५ किलो वजनी गट)
या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ, शिलवंत मॅडम महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांच्या उपस्थितीमध्ये सदर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.