पूर्ण दाबाने लाईट द्या शिंदे शिवसेनेच्या वतीने राशीन महावितरण ला निवेदनद्वारे मागणी.

राशीन ( प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन येथील विद्युत वितरण कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता कळंबे यांना शिवसेना राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे, शिवसेना महिला तालुका प्रमुख कमल मासाळ, गटप्रमुख विकास काळे, तालुका उपमुख वृषभ परदेशी, ईदूमोहन अमरनाथ पूजापाती,, भाऊसाहेब जाधव, अक्षता देशमाने, खालीद अंसारी, विठ्ठल वाघमारे, अभिजीत कुंभार, विलास काळे,व इतर रहिवासी नागरिकांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, युवा तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे , मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक सहा मध्ये काळेवाडी रोड येथे पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा मिळणेबाबत निवेदन कार्यालयीन ऑपरेटर गणेश तिखे यांना देण्यात आले आहे.
चिलवडी गावठाण हद्दीतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मौजे राशिन परिसरातील वार्ड क्रमांक सहा मधील काळेवाडी रोड येथील भागात सुमारे २०० ते २५० लोकवस्ती असून या भागात सध्या असणाऱा विद्युत पुरवठा मौजे चिलवडी गावठाण अंतर्गत होत आहे .परंतु सध्या अतिरिक्त लोड असल्याने वारंवार लाईट जाणे लाईट डीम होणे, पूर्ण दाबाने लाईट न मिळणे या कारणास्तव येथील नागरिक त्रस्त झाले आहेत .मागील दोन महिन्यापासून या भागाकरिता वायरमन देखील उपलब्ध नाही. राशीन वीज कार्यालयात वरील समस्या अंतर्गत फोन केला असता सहाय्यक अभियंता कळंबे फोन उचलत नाहीत, मोबाईल जाणून बुजून दुसऱ्याकडे ठेवणे, असा खोटारडा पणा करून राशीन केंद्रातून वेळोवेळी पळता पाय काढताना दिसतात नागरिकांना व शेतकऱ्यांना उडवा उडवी ची उत्तरे दिली जातात सदर भाग राशीन ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या भागाला राशिन उपकेंद्र मार्फत स्वतंत्र डीपी(विद्युत रोहित्र) दिलेले नाहीत . यासंदर्भात यापूर्वी अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते तसेच वेळोवेळी मागणी करून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही तरी आपण या कामी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून संबंधित विभागाला तात्काळ तक्रारी चे निवारण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी राशीन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. असे न झाल्यास राशीन शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्यात येईल याची सर्व जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल.