खड्ड्यात साचलेल्या दूषित पाण्यामुळे राशिन डायनामिक इंग्लिश शाळेच्या मुलांचा प्रवास खडतर.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन येथील डायनामिक इंग्लिश स्कूलच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे शाळेतील मुलांना व पालकांना दैनंदिन अतिशय खडतर प्रवास करावा लागत असून जास्त साचलेल्या दूषित पाण्यातून दुचाकी ने जाताना गाडी पाण्याच्या मध्यभागी बंद पडणे, गाडी घसरणे असे प्रकार नेहमीच होत.
असतात खोलगट खड्ड्यात साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शालेय मुले गाडीवरून पडण्याची भीती भेडसावत आहे तसेचअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही त्या अनुषंगाने डायनॅमिक इंग्लिश स्कूलच्या संबंधित शालेय विभागातील संस्थापक, प्राचार्य,शिक्षक यांनी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून घ्यावा किंवा पाण्याची चारी योग्य दिशेला काढून द्यावी जेणेकरून शाळेतील मुलांना व पालकांना येण्या जाण्याचा मार्ग सुखकर होईल याची दक्षता डायनामिक शालेय कमिटीने घ्यावी अशी मागणी शाळेतील मुलांकडून व पालकाकडून होत आहे.