पावसाळ्यात खोदकाम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाईबाबत मनसेचा राशीन ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे इशारा.
राशीन (प्रतिनिधी):-जावेद काझी.चालू वर्षी राशिन व परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कर्जत तालुक्यातील राशीन येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये भर पावसाळ्यात खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे लेखी निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की भर पावसाळ्यात वार्ड क्रमांक तीन मधील खोदकाम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच खोदकामाची परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी. तसेच राशीन ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक तीन मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चालू झाले आहे. यामध्ये न्हावी गल्ली महादेव मंदिर या ठिकाणी चाललेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या ठिकाणी झालेल्या कामाची चौकशी करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच वार्ड क्रमांक.६
मधील हॉटेल अन्नपूर्णा पाठीमागील तीन ठेकेदारांनी केलेल्या कामाची पाहणी केली असता त्यातील एका ठेकेदाराचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असून त्या कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष सचिन साळवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.