पुरवठा विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे गरीब, सर्वसामान्य रेशन लाभ धारक वेटीस धान्य मिळेना!पॉश मशीन बंद?

राशीन ( प्रतिनिधी ):-जावेद काझी.महाराष्ट्र शासन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी पुरवठा विभाग कर्जत यांच्याकडून चालू जुलै महिना अखेर पर्यंत तालुक्यातील रेशन दुकानदाराकडून धान्य पुरवठा रेशन धारकांना मिळालेला नसून याबाबत विचारणा केली असता पुरवठा विभागाकडून पॉस मशीन सर्वत्र बंद असल्यामुळें माहिती रेशन दुकानदाराकडून मिळत असून दिनांक २१.६.२०२४ जून रोजी पुरवठा विभागाकडून तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना तातडीची नोटीस बजावण्यात आली होती त्यामध्ये शिधापत्रिकेमधील मोफत धान्य लाभधारकांना ई-केवायसी नसलेल्या सदस्यांची आधार लिंक करणेबाबत तहसीलदाराकडून नोटीस पत्र काढण्यात आले होते. या सदर रील नोटीस मध्ये महाराष्ट्र शासनाकडून आपणास दरमहा मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले आहे
की धान्य वाटप करताना आपण आपल्या शिधापत्रिकेमधील सदस्यांची आधार कार्ड द्वारे ई-केवायसी अद्याप पर्यंत केलेली नाही. त्यामुळे आपण सदर कामकाज आपले स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत करून घ्यावयाचे आहे. रेशन कार्ड मधील सर्व सदस्यांची आधार लिंक करणे शासनाने सक्तीचे केलेले आहे. आपणास त्यापूर्वीही धान्य दुकानदार यांनी याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत परंतु पण या बाबत आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे शासनाचे धान्य चुकीच्या पद्धतीने वाटप सुरू असल्याने नोटीस मिळतात आधार सिडिंग करिता आधार कार्ड उपलब्ध करून देऊन आपल्या गावातील रेशन दुकानदाराकडून आधार लिंक करून घ्यावे.
तसेच आपल्या शिधापत्रिकेमधील मयत लाभार्थी याचप्रमाणे विवाह होऊन इतरत्र स्थलांतर झालेले सदस्य यांची नावे तहसील कार्यालयात येऊन कमी करून घ्यावीत. वरील प्रमाणे कार्यवाही आपण न केल्यास ई-केवायसी नसलेल्या सदस्यांना धान्य वाटप न करणेची तसेच ई-केवायसी नसलेल्या सदस्यांची नावे रेशन कार्ड मधून कमी करण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. व वरील प्रमाणे केवायसी करण्याची जबाबदारी संबंधित रेशन कार्ड धारकांची राहील. अशा प्रकारचे लेखी पत्र रेशनदुकानदाराकडून शिधापत्रिका लाभधारकांना देण्यात आले आहे. परंतु पॉश मशीनच संबंधित विभागाकडून मागील काही दिवसापासून बंद असल्या मुळे सर्व ऑनलाइन कामे ठप्प झाली असून गरीब गरजू सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे बंद झाले आहे.
याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी स्पष्टीकरण व माहिती देणे गरजेचे असताना पुरवठा विभाग व तहसीलदार उदासीन दिसत आहे. तर धान्य लाभधारकांचे रेशन दुकानदाराकडे हेलपाटे मारण्याचे काम सुरू असून धान्य मिळण्याची वाट शिधापत्रिका धारक करीत आहे.