राशीन मध्ये बकरी ईद कुर्बानी विना मोठ्या उत्साहात साजरी.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- बकरी ईद व आषाढी एकादशी दोन्ही धार्मिक सन एकाच दिवशी आल्यामुळे राशीन मध्ये बकरी ईद कुर्बानी न करता मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी करण्यात आली. नेहमीच्या ठरलेल्या परंपरेनुसार जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सकाळी ७.३०वा . ईदगाह मैदानाकडे रवाना झाले.
सकाळी ८.०० वाजता. ईदगाह मैदानावर ईदची नमाज, व खुदबा मौलाना अब्दुल रहीम यांनी पठण करीत कुर्बानी विषयी माहिती दिली तसेच यावेळी १० वी १२वी परीक्षेमध्ये मध्ये चांगले गुण मिळवून मेरीड प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार हशु अडवाणी विद्यालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी यांनी केला. यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकाची गळाभेट करीत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बंदोबस्त साठी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक सालगुडे, हेड कॉन्स्टेबल काळे, पोकळे, इतर हिंदू व मुस्लिम बांधवांनी धार्मिक एकाेपा सामाजिक बांधिलकी जपत गळाभेट करीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत ईद दिवशी कुर्बानी न करण्याच्या निर्णयावर ठाम राहत बकरी ईद मोठ्या उत्साहात करण्यात आली. तसेच कुर्बानी आज न करता शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने यावेळी घेतला.