मा. खासदार सदाशिव लोखंडे सपत्नीक राशीनच्या जगदंबे चरणी नतमस्तक.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन येथे रविवार दिनांक १६.६.२०२४ . रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार व सलग हॅट्रिक मारीत कर्जत जामखेड मतदार संघात आमदार म्हणून निवडून आलेले भूतपूर्व आमदार सदाशिव लोखंडे यांनी सपत्नीक जगदंबा देवीची पूजा, आरती, करीत दर्शन घेतले. यानंतर त्यांनी राशीन मुख्य बाजारपेठेत येऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांची भेट घेत मनमोकळ्यापणे राजकीय चर्चा व विचारपुस केली.
याप्रसंगी भाजपा माजी अध्यक्ष अरुण रेणुकर, कृषी सेवा केंद्राचे संचालक निवृत्ती पाटील , जगदंबा हॉटेलचे मालक सुरज परदेशी, माऊली हॉटेलचे मालक सोमनाथ दंडे या सर्वांनी सपत्नीक लोखंडे यांचा शाल ,फेटा, नारळ देऊन सत्कार केला.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते अलाउद्दीन काझी, एन एस पाटील, बबन सौताडे, संकेत पाटील, सोमनाथ दंडे, साहिल काझी,जे.के .मोटर्स चे संचालक जाकीर काझी, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.