श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत ते पैठण पायी दिंडी सोहळा
प्रस्थान कार्यक्रमास भाविकांनी सहभागी व्हावे : जन्मस्थळ विश्वस्त मंडळ

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत ते पैठण पायी दिंडी सोहळा जन्मस्थळ या ठिकाणा वरून २४/०३/२०२४ रोजी प्रस्थान होणार आहे. या पायी वारीमध्ये नामांकित कीर्तनकार, गायक, वादक सहभागी होणार आहेत वाटचालीमध्ये कीर्तन, हरिपाठ, भजन, काकडा, श्री संत गोदड महाराजांचे चरित्र गायन व रामायण असे कार्यक्रम होणार आहेत.
या पायी वारीमध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री प्रवीण विठ्ठलराव घुले पाटील व विश्वस्त मंडळ जन्मस्थळ यांनी केले आहे. या पायवारीची तयारी पूर्ण झाली असून शाही थाटातच महाराजांना पैठणला घेऊन जाणार असे वारीतील वारकऱ्यांनी ठरवले आहे. दिंडीमध्ये सामील होणाऱ्या भाविकांकडून एक ही रुपया न घेता भाविकांना परत आणले जाईल जे भाविक दिंडीत सामील होणार आहेत त्यांनी काल्याचे किर्तन होईपर्यंत थांबावे जर थांबायचे नसेल तर दिंडीत नाही आले तरी चालेल अशा सूचना विश्वस्त मंडळांनी केलेल्या आहेत तसेच श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या या दिंडीची आख्यायिका
संत मीराबाई यांच्या वंशातील असलेले संत गोदड महाराज यांना एकनाथ महाराज यांच्या शिष्यपंरपरेतील नारायणनाथ महाराज यांनी अनुग्रह दिला होता. गोदड महाराज हे आनंद सप्रदायामधील आहेत. गोदड महाराजांची दिंडी पंढरपूर येथे जात नाही तर केवळ पैठण येथे जाते. तसे पाटील गल्ली जन्मस्थळ या ठिकाणावरून दिंडीची सुरुवात पूर्वीच पुंडलिक महाराज परीट यांनी केली आहे. त्याचप्रमाणेश्री प्रवीण विठ्ठलराव घुले यांनी श्री संत सद्गुरु गोदड महाराज जन्मस्थळ पाटील गल्ली कर्जत येथून गेल्या वर्षीपासून दिंडी सुरू केली आहे. गोदड महाराज. जन्मस्थळ मंदिराचे पुजारी व विश्वस्त मंडळ यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या दिंडीचे हे ०२ रे वर्ष आहे. २४/०३/२०२४ रोजी कर्जत नगर प्रदक्षिणा करून आजोळ घरी मुक्काम व कीर्तन कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी २५/०३/२०२४ सकाळी ८ वाजता पैठण कडे प्रस्थान दुपारचा विसावा डिकसळ या ठिकाणी जयसिंग पाटील यांच्या घरी, संध्याकाळी मिरजगाव येथे मराठी मुलांच्या शाळेत मुक्काम व कीर्तन कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी २६/०३२०२४ रोजी दुपारचा विसावा रुई नालकोल या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या वतीने नियोजन, संध्याकाळी कडा या ठिकाणी मदन महाराज मठ येथे युवराज पाटील व धैर्यशील पाटील यांच्या नियोजनाने मुक्कामी चौथ्या दिवस २७/०३/२०२४ रोजी धामणगाव पोकळे वस्ती मारुती मंदिर या ठिकाणी तुकाराम बीजे निमित्त अर्जुन महाराज गोरखे गुरुजी यांचे हरी किर्तन पोकळे परिवाराच्या नियोजनाने,
संध्याकाळी माणिकदौंडी या ठिकाणी तुकाराम महाराज मंदिर समीर पठाण, महेश कुलकर्णी, सतीश आठरे, अमोल शेळके यांच्या नियोजनात मुक्काम, पाचवा दिवस २८/०३२०२४ रोजी दुपारी शिरसाटवाडी या ठिकाणी शिवाजी महाजन, चंद्रभान शिरसाठ यांच्या नियोजनात विसावा , संध्याकाळी अकोलकर वस्ती डांगेवाडी श्री विष्णुपंत अकोलकर सभापती पंचायत समिती पाथर्डी यांच्या नियोजनात, सहावा दिवस २९/०३/२०२४ रोजी दुपारचा विसावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर भगूर या ठिकाणी भगूर ग्रामस्थांच्या नियोजनात, संध्याकाळी घनवट वस्ती तळणी या ठिकाणी रामनाथ घनवट सर यांच्या नियोजनात, सातवा दिवस ३०/०३/२०२४ रोजी दुपारचा विसावा श्री दत्त मंदिर गटकळ वस्ती करे टाकळी येथे मनोहर गटकळ व कल्याण गटकळ यांच्या नियोजनात, संध्याकाळी पैठण स्टेडियम या ठिकाणी मुक्काम, ३१/०३/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ षष्ठी उत्सवानिमित्त नामदेव शास्त्री विधाते यांचे हरी कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रम तसेच संध्याकाळी ०७ ते ०९ आजिनाथ महाराज दानवे यांचे हरिकीर्तन व जागर कार्यक्रम,०१/०४/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ श्रीनाथ महाराज पैठणकर यांचे हरिकीर्तन व संध्याकाळी श्रीहरी महाराज पुरी यांचे हरिकीर्तन ,
०२/०४/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत दयानंद महाराज कोरेगावकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल त्यांनतर कर्जत साठी प्रतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती विश्वस्त मंडळाचे सदस्य दादासाहेब रोकडे यांनी दिली.