राशीनच्या आठवडे बाजाराचा निलाव आतापर्यंतचा इतिहास मोडीत काढीत विक्रमी बोली ५५ लाखांवर.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी .महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असलेला राशीन ग्रामपंचायतीचा मंगळवार आठवडे बाजारातील कर वसुलीचा वार्षिक निलाव ५४ लाख
८४ हजार रुपयांना गेला. हा निलाव पोपट राऊत यांनी विक्रमी बोली लावून घेतला. राशिन ग्रामपंचायत कार्यालयात बुधवार (ता.२०) रोजी राशीनच्या आठवडे बाजाराचा कर वसुलीचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पार पाडला. याप्रसंगी सरपंच नीलम भीमराव साळवे. ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, भीमराव साळवे, पोपट राऊत, कैलास राऊत, ऋषिकेश कानगुडे, नवनाथ कानगुडे, हनुमंत कानगुडे, बाळासाहेब जांभळकर, मारुती जांभळकर, महादेव जांभळकर, शहाजी जाधव, सचिन आढाव, उमेश शेटे, दादा परदेशी, त्रिंबक सोनटक्के, दयानंद आढाव आदी उपस्थित होते.
दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा निलाव पावणे चार लाखांनी वाढला. या निलावाची सरकारी रक्कम ४० लाख रुपये एवढी होती. हा निलाव पोपट राऊत यांनी या निलावत ५४ लाख ८४ हजार रुपयांची विक्रमी बोली लावून घेतला. यावेळी या निलावानंतर लगेचच राशींनच्या डेली मार्केटचा निलाव झाला. हा निलाव सचिन आढाव यांनी दोन लाख चार हजार रुपयांना घेतला. या डेली निलावाची सरकारी रक्कम एक लाख रुपये होती.
हा निलाव गतवर्षीच्या तुलनेत साठ हजारांनी वाढला आहे.