राशीन पाणी योजना पाईपलाईनला मोठी गळती ! ग्रामपंचायत च्या दुर्लक्षतेमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया.

राशीन (प्रतिनिधी )जावेद काझी. :- राशीन भिगवन रस्त्यावर खेड नजीक हॉटेल प्रकाश समोर राशीन येथे होणाऱ्या पाणी योजना पाईपलाईचा वाल मागील अनेक दिवसापासून लिकेज झाला की जाणून बुजून कोणी शेतकऱ्यांनी केला असून त्या लिकेज मुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया चालले आहे .तसेच राशीन येथे ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे यांच्या घराशेजारी देखील पाणी योजना पाईपलाईन फुटली असून सुरू असून या ठिकाणी देखील पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
याबाबत सांगून देखील राशिन ग्रामपंचायत चे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे. या दोन मोठ्या पाईपलाईन गळतीमुळे राशीनकरांना पाणी पाहिजे तेवढ्या प्रेशरने मिळत नसून, उन्हाळ्याच्या तोंडावर नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन्ही पाईपलाईनच्या गळती बाबत पत्रकार जावेद काझी यांनी ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांना माहिती दिली आहे. याबाबत ग्राम विकास अधिकारी काय पाऊल उचलतात व किती लवकर पाणी योजनेची होणारी गळती थांबवुन राशिन करांची होणारी पाण्याची भटकंती थांबवतात हे पाहणे गरजेचे आहे.