राशीन गावठाण चिंचेचे झाड ते ग्रामपंचायत वेशीपर्यंतच्या मंजूर डांबरी रस्ता पूर्ण खोदून करा :- ग्रामस्थांची मागणी

राशीन( प्रतिनिधी)जावेद काझी :- राशीन गावठाण मधील चिंचेच्या झाडापासून ते ग्रामपंचायत वेशी पर्यंत डांबरीकरण व मजबुतीकरण रस्ता मंजूर झाला आहे व त्याचे काम सुरू होणार आहे तरी सदरचा रस्ता हा पूर्ण खाली खोदून खडीकरण व मजबुतीकरण करून नंतर त्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रस्त्यालगतचे दुकानदार व रहिवासीयांनी ग्रामविकास अधिकारी गुरव यांना दिले आहे
या निवेदनात म्हटले आहे की सध्याच्या स्थितीमध्ये रस्ता डांबरीकरण करण्यात येऊ नये कारण रस्त्यालगत सर्व आम्ही दुकानदार व रहिवासी असून रस्ता हा अंदाजे एक फूट उंच झालेला असून आमची दुकाने व घरे खाली असल्याने पावसाळ्यात आमच्या दुकानात व घरात पावसाचे पाणी जात आहे त्यामुळे आमच्या व्यवसायांचे व घरातील वस्तूंचे मोठे नुकसान होत आहे
तसेच रमेश परदेशी यांच्या कडून येणारे पाणी व वाघुले चहा दुकानाकडून येणारे पाणी याची लेव्हल काढून पाणी योग्य रीतीने काढण्यात यावे जेणेकरून या रस्त्यावरील दुकानदाराची व रहिवाशांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सदरचा रस्ता खोदून त्याची लेवल काढून केल्यास पावसाळ्यात होणारे नुकसान टाळता येईल तरी सदरचा रस्ता हा खोदून खडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावा तसे न झाल्यास रस्त्या लगतचे दुकानदार व रहिवासी यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशा्रयाचे ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, शरद सोनवणे, सोमनाथ सोनवणे, हेमंत असवानी, विजय बोधे, अनंत आढाव, निलेश आगवणे, सचिन शिंदे, रवींद्र पंडित, गणेश पंडित, अशोक काळे, ईश्वर सोनवणे, नवनाथ पंडित, सचिन अच्छा, विश्वास अच्छा, अमोल पंडित, संदीप सोनवणे, अंकुश साळवे, संजय बोराडे, गोपाळ नारंग, रामशेठ नारंग, योगेश मस्के, नितीन शिंदे, मयूर बजाज यांच्या सह्यांचे निवेदन राशिन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम एम गुरव यांना देण्यात आले आहे.