ब्रेकिंग
अतिश सरकाळे यांची सहाय्यक आयुक्त, औषधे पदावर पदोन्नती

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
कर्जत | प्रतिनिधी चिलवडी, ता. कर्जत येथील अतिश शिवाजी सरकाळे यांची गोंदिया येथील अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्त, औषधे या पदावर पदोन्नती झाली आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सन २००४ मध्ये बी. फार्मसी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी सिपला व अजंता या नामांकित औषध उत्पादन कंपन्यांत सात वर्षे सेवा बजावली. त्यानंतर २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली. जळगाव, अहिल्यानगर आणि पुणे येथे त्यांनी औषध निरीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली.
सहाय्यक आयुक्त, औषधे या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशन, शंभु ऑइल मिल व मसाले, तसेच राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, कर्जत यांच्या वतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.