दादा पाटील महाविद्यालयात दिवाळी फराळ व माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न
कर्मभूमीत मिळणारा आनंद कुठेच मिळत नाही.. महेश पाटील (पोलीस निरीक्षक, जामखेड)

कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत शहरातील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयामध्ये हिरक महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ‘दिवाळी फराळ व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे’ आयोजन महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते.
या मेळाव्याला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, कार्याध्यक्ष सुनील शेलार, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, नानासाहेब निकत, प्रसाद ढोकरीकर, किरण पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे, लालासाहेब शेळके, डॉ. संदीप सांगळे, भूषण ढेरे, मंगेश खत्री, दीपकशेट शिंदे, विशाल म्हेत्रे, विजय तोरडमल, सागर लाळगे, अमित तोरडमल, भाऊसाहेब रानमाळ, पूजा सूर्यवंशी, किरणताई सूर्यवंशी आदि बहुसंख्य माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व माजी विद्यार्थ्यांचे ‘दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्याच्या’ निमित्ताने महाविद्यालयामार्फत व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘गीतबहार’ हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विजय सकट सर, प्रा. राम काळे, प्रसाद सूर्यवंशी, मंगेश कचरे, सुभाष बरबडे, गोविंद मंडलिक, वैष्णवी गदादे, नुपूर लहाडे, वेदिका गोंदकर, वैष्णवी नागवडे, आदि कलाकारांनी या स्नेह मेळाव्यामध्ये गीत सादरीकरण केले. गीतबहार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम काळे, प्रा. स्वप्निल म्हस्के व डॉ. प्रतिमा पवार यांनी केले.
दादा पाटील महाविद्यालयाने नुकतेच नॅकचे अ प्लस प्लस मानांकन प्राप्त करून देशात सहावे, महाराष्ट्रात तिसरे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे गुणांकन प्राप्त केले आहे. या मानांकनामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा होता. म्हणूनच माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल महाविद्यालयामार्फत सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
या स्नेह मेळाव्यानिमित्त माजी विद्यार्थी व जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी कॉलेज जीवनातील सुखद आठवणी व्यक्त केल्या. महाविद्यालयात आल्यानंतर या कर्मभूमीत आपल्या माणसांनी केलेला सन्मान आजपर्यंत कुठेही मिळाला नाही. सुट्टीवर असताना आवर्जून कुटुंबियांनासमवेत महाविद्यालयाला भेट देत असतो. महाविद्यालयात शिकत असताना सर्व गुणांनी घडलो असल्यामुळेच पोलीस पदावर काम करत असताना कुठेच कमी पडत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले
माजी विद्यार्थी संघाच्या कार्यकारिणी सदस्या व चांदे गावच्या सरपंच सौ. पूजा सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाल्याबद्दल व कु. मनस्वी किरण पाटील हिने राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत ब्रॉंझ पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा राजेंद्रतात्या फाळके व उपस्थित माजी विद्यार्थी संघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दिवाळी फराळ व स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, कार्याध्यक्ष सुनील शेलार, उपाध्यक्ष ऋषिकेश धांडे, अमित तोरडमल, खजिनदार प्रा. प्रकाश धांडे, समन्वयक डॉ. संजय ठुबे, सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक व आजी व माजी विद्यार्थी संघ यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय ठुबे यांनी तर आभार प्रा. विशाल म्हेत्रे यांनी मानले