लग्नात होणाऱ्या सत्कार खर्चाला फाटा देऊन कचरे कुटुंबाने 11000 हजारची रक्कम दिली प्राथमिक शाळेला…

कर्जत (प्रतिनिधी) :- नुकतेच कर्जत येथे कचरे आणि गोडसे हा शुभविवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी वीर वस्ती येथील वर पिता दत्तात्रय कचरे यांनी चिरंजीव शशिकांत यांचे विवाह निमित्त जिल्हा परिषद शाळेसाठी रुपये अकरा हजाराची देणगी रोख स्वरूपात दिली .खरोखरच एक आदर्श पायंडा त्यांनी या आपल्या जोगेश्वरवाडीत सुरू केला .सत्काराच्या खर्चाला फाटा देऊन त्यांनी शाळेच्या मदतीसाठी हा निधी दिला.
त्यांच्या या दिशादर्शक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांच्या या कार्याचा आदर्श नक्कीच ग्रामस्थ मंडळी घेतील एवढीच अपेक्षा .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक नेवसे जोगेश्वरवाडी प्रभागाच्या नगरसेविका लंकाताई खरात प्रथम नगरसेविका नीताताई कचरे देविदास खरात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा नामदास शिक्षण प्रेम सदस्य आप्पासाहेब नरवडे अमोल वीर कर्नाटका बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कचरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आबासाहेब पाटील सुरेश खिस्ती आदि मान्यवर उपस्थित होते