pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयात एमसीएस अभ्यासक्रम सुरू…

Samrudhakarjat
4 6 3 0 9 7

रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे एमसीएस अभ्यासक्रमाला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शासनाच्या नियमानुसार दादा पाटील महाविद्यालयामध्ये एमसीएस अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बीसीएस विभागप्रमुख प्रा. गणेश बुरटे यांनी सांगितले की, एमसीएस हा व्यावसायिक अभ्यासक्रम दादा पाटील महाविद्यालयात सुरू केल्याबद्दल व उत्तम लॅब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले. हा कोर्स अत्यंत माफक दरामध्ये महाविद्यालयामध्ये सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

अंबादासजी पिसाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, एमसीएस अभ्यासक्रम सुरू झाल्याने कर्जत व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पुणे- मुंबई सारख्या शहरांमध्ये ज्या सुविधा या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध करून दिल्या जातात, तशा सुविधा दादा पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांना देणार असल्यामुळे याचा नोकरी, व्यवसायामध्ये फायदा होणार असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. एमसीएस अभ्यासक्रम महाविद्यालयामध्ये सुरू झाल्याने नोकरी व व्यवसाय क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी लाभणार आहे. कर्जत व परिसरातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी तर आभार प्रा. लालासाहेब अनारसे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अक्षय शिंदे, प्रा. शिल्पा तोडमल, प्रा. अनिता तनपुरे, प्रा. निकिता राऊत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker