एन.एस.एस हे सेवावृत्ती दाखवण्याचे साधन आहे ; सुरज पाटील

कर्जत (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय सेवा योजना आयोजित हीरक महोत्सवी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन कोळवडी या ठिकाणी १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जतचे उपविभागीय कृषी अधिकारी सुरज पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
याप्रसंगी बोलताना सुरज पाटील यांनी सांगितले की, सेवावृत्ती दाखवण्याचे साधन एन.एस.एस आहे. मिळालेल्या शिक्षणाच्या संधीचे सोने करा, प्लास्टिकचा वापर टाळा. परसबाग तयार करून जनतेने जागरूक होऊन विषमुक्त अन्नाकडे वळावे यासाठी प्रयत्न करा. ध्येय निश्चित करून ध्येयाच्या प्राप्तीसाठी कशाचाही विचार न करता आपले आवडते क्षेत्र निवडून त्यामध्ये सर्वोच्च स्थान मिळविण्याचा संदेश दिला
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये लोकशासन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. लोकसहभागातून ग्रामविकासाकडची वाटचाल एन.एस.एस च्या माध्यमातून करता येते. लोकसहभागातून सामाजिक उत्तरदायित्व निभावता येते. एन.एस.एस चे संस्कार कधीही वाया जाणार नाही. सहचार भाव, स्वालंबन हे संस्कार एन.एस.एस मधून मिळतात. एन.एस.एस ही युवकांची मशागत करणारी योजना असल्याचे असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस गीताने झाली. स्वयंसेवक शुभम जाधव व साक्षी गांगर्डे या दोन स्वयंसेवकांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर बापू दवणे, युवराज खानवटे व राहुल नवले यांची मनोगते झाली.
या कार्यक्रमाला ग्रामसेवक तापकीर मॅडम, औदुंबर भोसले, मोहन डमरे, विनोद थोरात, महादेव दवणे, अशोक दवणे, सोमनाथ डमरे, शिवाजी कवडे, गणेश दवणे, किरण साबळे पांडुरंग कवडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकवर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास रोडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. आशा कदम यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती काळे व स्नेहा ढमे यांनी केले.