हाॅटेल साई प्युअर व्हेज चे २६ जानेवारी च्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात शुभारंभ

कर्जत प्रतिनिधी :- कर्जत शहरातील वालवड नगर रोड 132 के.व्ही च्यापुढ सुरू झालेल्या हाॅटेल साई प्युअर व्हेज चे २६ जानेवारी च्या शुभ मुहूर्तावर नवीन शुद्ध शाकाहारी व अद्यावत असे लॉजिंग याचा शुभारंभ संचालक सुरज व सुधीर तांदळे यांच्या मातोश्री सौ. शारदा मोहन तांदळे व श्री मोहन राजाराम तांदळे यांच्या हस्ते तर आ.रोहित पवार यांच्या मातोश्री बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्यासह मा. जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, उद्योजक अंकुश यादव, जेष्ठ नेते बळीराम यादव, नगरपंचायत चे पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, ज्ञानदेव लष्कर, जिल्हा
अध्यक्ष सुनील यादव, मा.सरपंच पोपट तांदळे, मा सरपंच विजूकाका तोरडमल, महादेव तांदळे, मच्छिंद्र शिंगाडे, कर्जत शहर व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष बिभीषण खोसे, डॉ सुरेंद्र जवणे,नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, नवनाथ लष्कर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. तर आ. राम शिंदे यांनी या हाॅटेल साई प्युअर व्हेज ला सदिच्छा भेट देऊन तांदळे परिवाराला शुभेच्छा दिल्या.
कर्जत शहरातील मराठमोळ्या चटपटीत खवय्यांसाठी हाॅटेल साई प्युअर व्हेज खास अद्यावत बनविण्यात आले आहे. आई शारदा व वडील मोहन तांदळे यांच्या सहकार्याने यशस्वी पणे सुधीर व सुरज तांदळे या बंधूंनी विचार पुर्वक ह्या हाॅटेल ची निर्मिती केली आहे. या हॉटेलमध्ये लग्न समारंभ,वाढदिवस, कंपनी मिटिंग विविध छोट्या मोठे कार्यक्रम घेण्यासाठी कार्यालयाची सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक लॉजिंग ची व्यवस्था अतिशय कमी दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेवणाचे दर माफक प्रमाणात आहेत. भरपुर सुविधा देणारे भव्य दिव्य हाॅटेल सुरू करून या बंधूंनी कर्जत शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवला आहे.
हाॅटेल साई प्युअर व्हेज च्या उदघाटन प्रसंगी सुप्रसिद्ध इंस्टाग्राम फेम तनुश्री पुणेकर यांचा मराठी व हिंदी गाण्यावरील सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात स्त्री व पुरूषांनसह युवकांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्वांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.