पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतच होणार साजरा : आ. रोहित पवार

कर्जत प्रतिनिधी : – चौंडी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मदिन सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो गेल्यावर्षीही आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मोत्सव कार्यक्रम शासनाचा एक रुपया न घेता कर्जत-जामखेड येथील नागरिकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला होता. मात्र यावेळी सरकार बदलल्याने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यास आम्हाला प्रशासनाच्यावतीने देण्यात येणारी परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र दि. ३१ मे रोजी जयंतीनिमित्त ग्रामपंचायत, गावकरी व पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांच्यावतीने काढण्यात येणारी यात्रासाठी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची कर्मभूमी उज्जन येथून गजराज आले आहेत त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यात्रा निघेल व मी त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहे. जरी परवानगी दिली नाही तरी यात्रा काढण्याचा निर्धार ग्रामस्थ, वंशज व आ. रोहित पवार यांनी केले आहे. याबरोबरच प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी आ. रोहित पवार यांनी केली आहे.चोंडी ग्रामपंचायत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे व आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या विविध संस्कृतीक कार्यक्रमांना प्रशासनाने परवानगी नाकारली असून, या बाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आ. रोहित पवार यांच्यावतीने चोंडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे हेही उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, आहिल्याबाई होळकर यांची यात्रा ही दरवर्षी प्रथेप्रमाणे निघणार असून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, भाविक भक्त व अध्यात्मिक लोक यांच्या समवेत मीही एक यात्रेकरू म्हणून यात सहभागी असेल. दि. ३१ मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या शासकीय कार्यक्रमास आमचा पाठिंबा आहे. तसेच या कार्यक्रमासाठी लागणारी मदतही करण्याची आमची तयारी आहे. या कार्यक्रमासाठी येत असलेले राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे येण्यापूर्वी सकाळी सहा वाजता आपली यात्रा शांततेत सुरू होईल आणि ती साडेदहा वाजेपर्यंत संपेल सुद्धा मात्र आम्ही घेत असलेल्या कार्यक्रमांना जरी प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी आम्ही १०० टक्के शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांच्या वतीने यात्रा काढणार आहोत असा निर्धार यावेळी आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी दि. ३१ मे रोजी जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी पुर्व तयारी म्हणून येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात कर्जत जामखेड तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी आ. रोहित पवार यांच्या समवेत आहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, उपसभापती कैलास वराट, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, संचालक प्रकाश सदाफुले, राष्ट्रवादीचे नेते प्रसाद ढोकरीकर, माजी सभापती राजेंद्र गुंड,नगरसेवक संतोष म्हेत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात,नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल ,भास्कर भैलुमे, अभय बोरा,माजी सरपंच अंगद रूपनर, नगरसेवक देवीदास खरात, विजय पावने, विजय देवकाते, श्रीमंत शेळके, तानाजी पिसे आदी उपस्थित होते.