Advertisement
ब्रेकिंग

मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त राशिन गावचे भूमिपुत्र विठ्ठल थोरात यांच्या कथा कलावंत विठ्ठलाची पुस्तकाचे प्रकाशन.

Samrudhakarjat
4 1 1 6 8 9

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :-  राशीन येथे मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून राशीन गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ तमाशा कलावंत, वगनाट्यलेखक विठ्ठल थोरात राशीनकर यांच्या कथा : कलावंत विठ्ठलाची या जागर समाज परिवर्तनाचा पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन दिमाखात करण्यात आले.सदर कार्यक्रम श्री जगदंबा देवी मंदीराच्या प्रांगणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास तमाशा कलावंत हसनभाई पाटेवाडीकर, संगीतरत्न वसंतराव चव्हाण,

खान्देश भूषण भिका भिमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे फडमालक मा. योगेशकुमार गोपाळ सांगवीकर,संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचे जावई दिलीप काटे, भूमकर तमाशा मंडळाचे फडमालक अशोक काटे,जागर समाज परिवर्तनाचा प्रकाशनाचे किशोर जाधव मा. सरपंच शिवदास शेटे, युक्रांदचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. नवनाथ जांभळकर,

कविवर्य हनुमंत येवले, अनिल मंडलिक, जगदंबा पब्लिक ट्रस्टचे सागडे भाऊसाहेब, शरदचंद्र शेटे, ज्येष्ठ पखवाज वादक बाळासाहेब आढाव तसेचप्रगतशील शेतकरी एन . एस. पाटील, सुभाष जाधव,शिवा संघटनेचे नितीन शेटे, मयूर धनवडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker