ब्रेकिंग
सोयब काझी यांचा शिंदे सेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या डॉ.इनामदार यांच्या वतीने सत्कार.

Samrudhakarjat
4
0
1
8
9
2
राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील सोयब रियाजोद्दीन काझी यांची नुकतीच भाजपा अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल कर्जत येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शबनम इनामदार यांच्या वतीने सोयब काझी यांचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, गुच्छ, देऊन पेढे भरवीत पुढील कार्यास शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. इनामदार यांचे पिता उस्मान उमर शेख, मातोश्री तमीज शेख, भाजपा महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त सदस्य तात्यासाहेब माने, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दीपक जंजिरे ,पत्रकार जावेद काझी, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख, सुरेश कोंडलकर, मरकज मस्जिद चे प्रमुख जमीर काझी, जोयब काझी, सद्दाम काझी, इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.