वीज मंडळाच्या वसुली पथकाकडून थकीत वीजबिल भरणे सक्तीचे.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी.:- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी राशिन शाखेच्या वतीने विजबिल वसुली पथक सध्या फिरत असून गावात व परिसरात जोमाने थकित वीज बिल वसुली सुरू झाली असून.कमर्शियल (व्यावसायिक) यांचे एक विजबिल थकीत असणाऱ्या ग्राहकांचे देखील वीज कनेक्शन कट केले जाणार असून घरगुती मीटर ग्राहकांचे विजबिल तीन महिन्याचे थकीत असल्यास महामंडळाच्या या पथकाकडून वीज कनेक्शन कट करण्यात येणार आहे. अशी माहिती वीज महामंडळाच्या वसुली पथक अधिकाऱ्यांनी विज बिल बाबत विचारणा असता सांगितले. बिल भरण्यासाठी इतकी टोकाची भूमिका का घेण्यात येते असी विचारणा केली असता, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या महामंडळाकडे स्वतःचा पुरेसा विज पुरवठा साठा उपलब्ध नसल्याने अंबानी, अदानी, सारख्या इतर खाजगी वीज वितरण कंपन्याकडून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर महामंडळ विज विकत घेत असल्यामुळे त्या खाजगी कंपनींना महिन्याच्या महिन्याला वीज मंडळाला विजबील अदा करणे सक्तीचे व बंधनकारक असल्यामुळे सर्वत्रच थकित विज बिल जास्त प्रमाणात असणाऱ्या गावामध्ये सध्या वीज मंडळाकडून वसुली पथक नेमण्यात आले असल्यामुळे राशिन व परिसरातील वीज ग्राहकांनी थकीत विज बिल भरणा त्वरित करावा .अन्यथा वीज कनेक्शन विद्युत खांबावरून कट करण्यात येईल. असे आवाहन विद्युत वितरण कंपनीच्या वसुली पथकाकडून करण्यात येत आहे .
यावेळी सहाय्यक अभियंता पवार साहेब, डेप्युटी मॅनेजर कचरे साहेब, प्रधान तंत्रण चोथे साहेब, वायरमन संदीप साळवे, प्रदीप सायकर, तारासिंग जाधव, व इतर वीज मंडळाचे वसुली पथक कर्मचारी व अधिकारी थकित वीज वसुली जोमाने सुरू करत असल्याचे दिसून आले.