कर्जत शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची मागणी

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- मुंबई घाटकोपर येथील होर्डीग दुर्घटनेची पुनरावृत्ती कर्जत शहरात होवू नये यासाठी कर्जत शहरातील अनाधिकृत होर्डीग हटविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर युवक उपाध्यक्ष सुमित रमेश भैलुमे यांनी केली आहे. कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देवून त्यांनी ही मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध भागात होर्डीग कोसळून दुर्देवी घटना घडल्या आहेत. कर्जत शहरात मेन रोड, मराठी मुलांची शाळा, भांडेवाडी, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृत परिसर, कन्या शाळा, बेलेकर कॉलनी रोड, बाजारतळ या विविध भागांमध्ये अनाधिकृत होडींग उभारले आहेत. घाटकोपरसारखी दुर्देवी घटना घडल्यास त्याची जबाबदार कोणाची असेल ? या हॉर्डीगला कुणी परवानगी दिली, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी व तातडीने हे हॉर्डीग काढून घेण्यात यावेत. पुढील १० दिवसांत अनाधिकृत होर्डिंग काढून घेण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.