राशीन मध्ये मोहरमनिमित्त राजबाग सवार दर्ग्यावर सवारीची स्थापना.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.मोहरम निमित्त इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या शहीद आठवणींना उजाळा देत शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान राशिन येथे आणि परीट वाडी रस्त्या नजिक असलेल्या राजेबागसवार दर्ग्याच्या आवारात सवारींची स्थापना करण्यात आली.
सालाबाद प्रमाणे मोहरमच्या पाच तारखेला या सवारीची स्थापना करण्यात येते यावेळी धार्मिक विधी पार पाडीत जातीय मतभेद बाजूला ठेवत सलोखा जोपासत मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित असलेल्या हिंदू मुस्लिम बांधवांनी शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.
या पाच दिवसात मोहरम सवारी च्या दर्शनासाठी राशीन सह परिसरातून भाविक हार, फुले, चादरी, नारळ ,अगरबत्ती ,मलिदा,घेऊन मोठ्या संख्येने येत असतात. ७,९,१०, व्या दिवशी बसवलेल्या सवारींच्या अनुषंगाने वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हे कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम बांधवांची गर्दी पहावयास मिळते. आलेल्या नागरिकांना मलिदा शरबत असा प्रसाद वाटण्यात येतो. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राजबाग सवार समितीचे पदाधिकारी व सदस्य करतात.