मा. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राशिन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनाआयुष्यमान भारत कार्डचे मोफत वाटप सुरू.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व राशिन ग्रामपंचायत यांच्या संयुक्त माध्यमातून राशीन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयुष्यमान भारत कार्ड मोफत काढून मिळत असून या योजनेचे उद्घाटन राशीनच्या सरपंच नीलम भीमराव साळवे यांचे पती भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश कदम, ग्रामपंचायत सदस्य दया आढाव , विनोद आढाव मारुती जांभळकर,आशा सेविका, रोहित पवार व एकात्मिक विकास संस्थेचे प्रशांत कर्वे , राजेंद्र पारेकर, प्रमोद वाघमारे, सुनील ननवरे व इतर लाभार्थी महिला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना असून. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड प्रधान करते या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना रुग्णालयात जाऊन पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळवू शकतात. सरकारने ही योजना सर्वसामान्यां साठी, दारिद्र्य रेषेखालील लोकांकरिता, (sc.st) बेघर ,निराधार, दीक्षा मागणारी व्यक्ती, व इतर व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आयुष्यमान भारत कार्ड ही योजना राशीन ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज पासून पुढील आठ दिवस सकाळी १० ते ५ या वेळेत राहणार असून. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जाताना रेशन कार्ड (ऑनलाइन नंबरअसलेले) आधार कार्ड, किंवा पॅन कार्ड, मोबाईल येऊनच जाणे बंधनकारक आहे आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ राशीन व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन राशीनच्या लोकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे यांनी केले आहे.