दादा पाटील महाविद्यालयाच्या बी.सी.एस विभागातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे आय.टी कंपनीत निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयातील बी.सी.एस विभागातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारे हडपसर-पुणे येथील ‘यांत्रा सॉफ्टवेअर सोलुशन्स’ आय.टी या नामांकित कंपनीत नुकतीच निवड झालेली आहे.
बी.सी.एस विभागातील अबुजार शेख, प्रिती पाटील, सचिन गवळी या निवडकर्त्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना भावी कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. भागवत यादव, प्रा. गणेश बुरटे व बी.सी.एस विभागातील प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवकवर्ग उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर यांनी तसेच बी.सी.एस विभागप्रमुख प्रा. गणेश बुरटे, तसेच विभागातील प्रा. लालासाहेब अनारसे, प्रा. प्रज्ञा तनपुरे, प्रा. शिल्पा तोडमल, प्रा. अक्षय शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी निवडकर्त्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.