समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

कर्जत तालुका( प्रतिनिधी) :- टी एम जी क्रिएशन व एम व्ही एस सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक.28.5.2023 रोजी सकाळी 10.30 ते ५ या वेळेत साहित्य मंदिर वाशी नवी मुंबई येथे राष्ट्रीय कर्तुत्व महोत्सव सलाम इंडिया अभिमान पुरस्कार समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी राहणार राशिन ता. कर्जत जिल्हा अहमदनगर. यांनी कोराेना व इतर काळात पत्रकारीच्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक,
राजकीय व सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्नावर भर देत सध्या दहा लाखापेक्षा जास्त वाचक संख्या असलेले कर्जत तालुक्यातील नंबर १ वर अग्रेसर असलेल्या समृद्ध कर्जत पोर्टल च्या माध्यमातून यशस्वीपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असलेल्या उत्तुंग व उत्कृष्ट पत्रकारितेमुळे ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र प्रधान करीत जावेद काझी यांना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय महानिरीक्षक मनोज वसंत बाडकर तटरक्षक पदक, कमांडर तटरक्षक पश्चिम क्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा ,दिव दमन, यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आले. यासाठी समृद्ध कर्जतचे संपादक/ नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, ज्येष्ठ पत्रकार आशिषजी बोरा, ऋषिकेश पवार यांचे विशेष पाठबळ लाभले. यावेळी व्यासपीठावर निला बरी भोसले, कामगार उपा
आयुक्त सिने अभिनेत्री चिनमयी सुमित, डॉ. सलीम शेख अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, राजय डॉक्टर रमा भोसले प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय, मा. विशुभाऊ बापट, कुटुंब रंगलय काव्यात फेम, लिज्जत पापडचे सीईओ, सुरेश कोते साहेब, , लोकशाहीर नंदेश संचालिका,टी एम जी क्रिएशन तसेच कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सौ. सलमा खान, समन्वयक स्मिता सहस्त्रबुद्धे, नासिर खान व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरी देशपांडे व नासीर खान साहेब यांनी केले.
तसेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सेपरेट हॅपिनेस फाउंडेशनचे साैमय महापात्रा, अलक लाईन लाईफचे सदानंद उमाळे, संजरी फाउंडेशनचे इसाभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते हमीद मुलानी साहेब, संगीता तावडे, रमा आठवले, वांबुरे मॅडम, नवी दिल्ली येथील सनदी अधिकारी कपिल मित्तल, तसेच समृद्ध कर्जत पोर्टल व राजकीय सामाजिक व इतर ग्रामस्थ वाचकांकडून जावेद काझी यांना मिळालेल्या सलाम इंडिया राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव व्यक्त होत आहे.