बहुजन समाजाच्या शिक्षणाची गरज ओळखून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, डॉ. प्रमोद परदेशी व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
याप्रसंगी इतिहास विभागाचे डॉ. हरीष भैलुमे यांनी कर्मवीरांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बहुजन समाजाच्या शिक्षणाची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेची निर्मिती झाल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय काढून शैक्षणिक चळवळ उभी केली. राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून प्रेरणा घेऊन त्यांनी आपलं शैक्षणिक कार्य महाराष्ट्र मध्ये सुरू केले. वसतिगृहाची संकल्पना ही कर्मवीर भाऊराव पाटलांनीच आपल्या संस्थ संस्थेमध्ये यशस्वीरीत्या राबवली. महात्मा गांधींनी कर्मवीरांच्या शैक्षणिक उपक्रम व वसतिगृहाबद्दल गौरवोद्गार काढलेले होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगत उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले.