शिवसेनेच्या तालुका उपप्रमुख पदी ऋषभ परदेशी तर राशीन शहर उपप्रमुख पदी सौरभ काळे यांची निवड.

राशीन ( प्रतिनिधी )जावेद काझी. :- शिंदे शिवसेनेच्या वतीने रेहकुरी अभयारण्य कर्जत येथे पक्षाच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग मध्ये शिंदे सेनेचे जिल्हा पक्ष निरीक्षक अभिजीत कदम साहेब, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, तसेच कर्जत तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके यांच्या हस्ते शिवसेनेच्या तालुका उपमुख्यपदी ऋषभ परदेशी तर राशीन शहर उपप्रमुख पदी सौरभ काळे यांची सर्वानुमते पत्र देऊन निवड करण्यात आली,
याप्रसंगी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऋषभ परदेशी व सौरभ काळे यांना झालेल्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या, यावेळी नगर जिल्हा पक्ष निरीक्षक अभिजीत कदम साहेब, दक्षिण महिला जिल्हाप्रमुख मीरा शिंदे, वैद्यकीय कक्ष जिल्हाप्रमुख डॉक्टर शबनम इनामदार, तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे, राशीन जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे आदी पदाअधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.