Advertisement
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending

माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

Samrudhakarjat
4 0 1 8 9 2

कर्जत (प्रतिनिधी) :- कृषी पर्वेक्षकास खंडणी मगितल्यावरून बहिरोबावाडी येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक नवनाथ जत्ती यांना एक लाख पंधरा हजार रुपयांची खंडणी ची मागणी करून रात्री अपरात्री फोन करून मानसिक त्रास दिल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश तुळशीराम तोरडमल व दादा शिर्के यांच्या वर खंडणीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ चिंतामन जत्ती, वय 56 वर्षे, व्यवसाय नौकरी (कृषी पर्यवेक्षक, कर्जत -1), रा. कुळधरण रोड, कर्जत, ता. कर्जत, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जत्ती यांच्याकडे तालुका कृषी कार्यालय कर्जत अधिनस्त हद्दीतील एकुण 24 गावे असुन त्यामध्ये बहिरोबावाडी, सुपा, चिचोली काळदात या गावांचा सुध्दा समावेश आहे. काम करत असताना त्यांना गणेश तुळशीराम तोरडमल, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत याने ०७ जुलै रोजी तालुका कृषी कार्यालय, कर्जत येथे माहिती अधीकार अधीनीयम २००५ अन्वये अर्ज केला व सदर अर्जामध्ये महाडिवीटी अंतर्गत बहिरोबावाडी, सुपे, रेहकुरी, वालवड, चिंचोली काळदात या गावांमध्ये ठिबक सिंचन योजनेप्रमाणे किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला याबाबत माहिती मागीतली, तोरडमल याने सदरची माहिती मागीतल्यावरुन त्यांना तालुका कृषी अधीकारी कार्यालय कर्जत यांचा कडून माहिती देण्यासाठी 

आकारण्यात येत असलेली शासकिय फि रक्कम 2844 रुपये जमा केल्यानंतर दि. २२ सप्टेंबर रोजी माहिती त्यांना देण्यात आली होती. माहिती अधीकार अर्जान्वये अर्ज करुन ठिबक सिंचन योजनेतील वरील 05 गावांमधिल माहिती अर्जदार गणेश तुळशीराम तोरडमल, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत यांना मिळाल्यानंतर तेथुन पुढे त्यांनी वारंवार जत्ती यांना रात्री अपरात्री फोन करुन तुमच्या मिळालेल्या माहितीमध्ये मला बराच काळा बाजार दिसुन येतोय, मी तुमची आता तक्रार करणार आहे. तुम्हाला जर तक्रारीपासुन सुटकारा पाहिजे असेल तर तुम्ही माझेसोबत तडजोड करा असे म्हणून तो जत्ती यांना धमकावत होता. ठिबक सिंचन योजनेतील लाभार्थ्यांना ठिबक सिंचनचे वाटप करताना कोणतीही अनियमीतता केलेली नसुन तसेच कुठल्याही शेतक- यांची माझ्या कामाबाबत कसलीही तक्रार नाही असे जत्ती यांनी तोरडमल याला सांगितले,

त्याने मला तु निट रहा आणि माझे सोबत व्यवस्थित तडजोड कर, नाहीतर मला तु बाहेर रस्त्यावर कोटे फिरताना दिसला तर मी तुझ्या अंगावर गाडी घालुन तुला मारुन टाकेल अशी धमकी देऊ लागला, गणेश तुळशीराम तोरडमल यास भी पैस द्यावेत तसेच मी त्याचेसोबत तडजोड करावी याकरीता आणखी दादा शिर्के, रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत हा सुध्दा मला वांरवार फोन करुन, साहेब तुम्ही गणेश तोरडमलचा काय विषय आहे तो मिटवुन टाका, नाहीतर तुम्हांला आमचेकडून त्रास होईल असे म्हणत होता. त्यानंतर गणेश तुळशीराम तोरडमल व दादा शिर्के, दोघे रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत हे वांरवार मी शासकिय कामकाज करत असताना किंवा शेतात व्हिजीट साठी गेलो असताना मला भेटायचे व माझ्या अंगावर धावुन येऊन तुला प्रकरण मिटवुन घेवचे का नाही, नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ असे म्हणत .

तुला अंगावर गाडी घालुन जिवेच मारेन अशी धमकी देयचा. मी कर्जत तालुक्यातील राहणारा असुन, गणेश तुळशीराम तोरडमल यास व-याच दिवसांपासुन ओळखत आहे. त्याचेविरुध्द यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. मला गणेश तोरडमल याचे पासुन माझे जिवीतास धोका जाणवु लागल्याने सदरचा प्रकार मी कामकाज करत असलेल्या ठिकाणचे तालुका कृषी अधीकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांना सांगुण गणेश तुळशीराम तोरडमल व दादा शिर्के, दोघे रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत हे नी शासकिय कामकाज करत असताना, मला तुमचेकडे असलेल्या गावांमधिल ठिबक सिंचन वाटपामध्ये अनियमीतता असल्याचे माझ्याकडे सर्व पुरावे असुन तुम्ही मला खंडणी म्हणुन पैसे दया असे म्हणुन माझ्या अंगावर धावुन येऊन मला शिवीगाळ करत आहे तसेच मला अंगावर गाडी घालुन जिवे ठार मारुन टाकेन अशी धमकी देत आहे याबाबत त्याना सांगितले. गणेश तोरडमल  

हा मला वांरवार पैश्यांची मागणी करत असल्याने तसेच त्याला मी पैसे देत नसल्याकारणाने त्याने माझेवर दबाव टाकण्यासाठी दि. 28/11/2023 रोजी मा. विभागीय कृषी सह संचाचक पुणे यांचे कार्यालयात मी व विकास सुपेकर असे आमचेकडे असलेल्या गावांच्या नावाने तक्रारी अर्ज दिला.

त्यानंतर गणेश तोरडमल व दादा शिर्के हा दि. 06/12/2023 रोजी रात्री 9/00 वा. तालुका कृषी अधीकारी कार्यालय कर्जत यांचे कार्यालयात आले व मी आणि विकास सुपेकर असे आमची तक्रार करु लागले, त्यावर पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधीकारी यांनी गणेश तोरडमल यास तु आमचे लोकांना त्रास का देतोस असे विचारले असता, गणेश तुळशीराम तोरडमल याने मी शासकिय नोकर, ठेकेदार यांच्याविरुध्द तक्रारी करून तडजोड करण्यासाठी त्यांचेकडून पैसे घेत असतो, त्या पध्दतीनेच माझा अर्ज तुमच्या ज्या कर्मचारी यांचा संदर्भात असेल यांनी माझे काय असेल ते मिटवावे, त्यांनतर मी तुमच्या लोकांना कसलाही त्रास देणार नाही असे पद्मनाभ म्हस्के यांना रिजल तसेच मला तडजोड म्हणुन 1 लाख रुपये, पुणे येथे अर्ज देण्यासाठी झालेला खर्च 10000 व माहिती अधिकार अर्ज खर्च 5000 असे एकुण 1,15,000 रुपये खंडणी म्हणुन द्यावे लागतील अस सांगितले, यावर पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधीकारी यांनी जागुन-बुजुन त्याचे कार्यालयात ऑडीओ व व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गणेश तोरडमल यास दि. 8/12/2023 राजी संध्या 7/00 वाजता भेटायला ये असे सांगितले. त्यानंतर दि. 8/12/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास गणेश तुळशीराम तोरडमल व दादा शिर्के, दोध. रा. दहिरोबावाडी, ता. कर्जत हे तालुका कृपो कार्यालय कर्जत याँच दालनात आले. त्यानंतर पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधीकारी यांनी मी व विकास सुपेकर असे दोघांस बोलावून घेतले, तेथे आमच्यात चर्चा झाली, गणेश तोरडमल याने मला पैसे द्या, मी यापुढे परत त्रास देणार नाही तसेच मला पैसे मिळत असतील तर मी शुन्य मिनीटान को-या कागदावर पण सही करतो असे म्हणाला, त्यावर पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधीकारी यानी व्याधसमार कोरा कागद ठेवला असता, त्याने त्यावर लगेच सही केली, त्यानंतर मी माझे खिशातील 200 रुपये दराच्या नोटाचे 2 बंडल एकुण किंमत 40000 व 500 रुपये दराच्या 19 नोटा व 100 रुपये दराच्या 5 असे 10000 असे एकुण 50000 रुपये टेबलवर ठेवले ते दादा शिर्के याने घेऊन त्याचे खिशात ठेवल हाते. तरी, दि 7/7/2023 रोजी ते दि. 8/12/2023 रोजी 7 वाजेच्या दरम्यान गणेश तुळशीरान तारडमल व दादा शिर्के, दोघे रा. बहिरोबावाडी, ता. कर्जत यांनी माहिती अधीकार अधीनीयम 2005 नुसार अर्ज केला व सदर अर्जामध्ये महाडिबीटी अंतर्गत बहिरोबावाडी, सुपे, रेहकुरी, वालवड, चिंचाली काळदाल या गावांमध्ये टिपक सिंचन योजनेप्रमाणे किती लाभार्थ्यांना लाभ मिळाला याबाबत माहिती प्राप्त करुन, सदर प्रकरणामध्य काळादावार झालेला असुन अनियमीतता दिसुन येत असल्याचे सांगुन, मला वारंवार मी शासकिय कामकाज करत असताना पैशाची मागणी केली तसेच मी पैसे देण्यास तयार नसल्याने माझे अंगावर धावुन येऊन मी करत असलेल्या शासकिय कामकाजात अडथळा आणला तसेच मला शिवीगाळ, दमदाटी करुन माझे अंगावर गाडी घालुन मला मला जिवे ठार मारुन टाकेन अशी धमकी देऊन, मला मृत्यु किंवा जयर दुखापतीची भिती घालून, माझेविरुध्द दिलला तक्रारी अर्ज मागे घेण्यासाठी तसेच भविष्यात कोणताही माहिती अधीकार कायदयान्वये अर्ज न करण्यासाठी मला एकुण 115000 रुपये खंडणीची मागणी करुन दि. 8/12/2023 राजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास माझेकडून तालुका कृषी अधीकारी यांचे दालनात 50000 रु रोख रक्कम खड़णी म्हणुन घेतली आहे, असे जत्ती यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

3.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker