राशिन भांबोरा मंडल दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट अखेर शिवसेनेच्या मागणीला यश.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- शिंदे सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके यांच्या नेतृत्वाखाली राशीन शहर शिवसेनेच्या वतीने कर्जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा असे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पातळीवर दखल घेत राशीन व भांबोरा महसूल मंडळ दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य आमदार प्राध्यापक राम शिंदे या सर्वांचे आभार व अभिनंदन व्यक्त करीत राशींनच्या मुख्य बाजारपेठेत आभार फलक लावण्यात आले
असून शिंदे सेना तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके, युवा सेना तालुकाप्रमुख सोमनाथ शिंदे, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे ,तालुका उपप्रमुख ऋषभ परदेशी, पंचायत समिती गण प्रमुख गणेश मोढळे ,राशिन शहर प्रमुख दीपक जंजिरे, कर्जत तालुका महिला आघाडी प्रमुख सौ.कमल मासाळ, युवा सेना प्रमुख योगेश भवर, राशीन शहरउपप्रमुख मच्छिंद्र सुद्रिक,सुनील काळे, व इतर शिवसेना कार्यकर्ते ग्रामस्थांच्या वतीने राशीन व भांबोरा महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन व आभार राशिन व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.