कर्जत : सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह मुलींचे या ठिकाणी ६० वृक्षांचे वृक्षरोपण करत महामानवाला अभिवादन,

कर्जत (प्रतिनिधी) :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह मुलींचे येथे सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने ६० वृक्ष लावण्यात आले.
आणि त्या वस्तीगृहात राहणाऱ्या साठ मुलींना त्याचे पालकत्व देण्यात आले. ६ डिसेंबर चे अवचित साधून चांगल्या पद्धतीत वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणासाठी सर्व सामाजिक संघटनेने खूप मेहनत घेतली. वृक्षारोपण झाल्यानंतर सर्वसामाजिक संघटनेचे शिलेदार अनिल तोरडमल व पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व वस्तीगृहातल्या मुलींना स्वच्छते विषयी व वृक्षरोपना विषयी माहिती देण्यातआली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या अधीक्षका सबिना कुरेशी यांनी सर्व सामाजिक संघटनेचे आभार मानले. यावेळी वस्तीगृहाच्या देखरेख करणारे दळवी मॅडम वटाने मॅडम व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.