आखोणी येथील वि.का.से. सोसायटी मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी बाबत सभासदांचे कर्जत येथे उपोषण सुरू.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- मौजे आखोणी, ता. कर्जत येथील वि.का.से.सो. मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणेबाबत सभासदांचे व इतर नागरिकांचे सहाय्यक निबंधक कार्यालय कर्जत येथे कालपासून उपोषण सुरू झाले असून आजचा उपोषण चा दुसरा दिवस असून उपोषणकर्त्याच्या मते
मौजे आखोणी, ता. कर्जत येथील वि.का.से.सो. मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे गरजेचे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाला आहे. त्याची मुद्देनिहाय माहिती खालील प्रमाणे
१) ५० हजार प्रोत्साहनपर योजनेमध्ये सन २०१७ ते २०२० मध्ये कर्ज घेतलेल्या सभासदांना मिळालेल अनुदान योजनेची चौकशी करण्यात यावी, त्यामध्ये कर्ज नसलेले, अपात्र, जमिन नसलेल्या सभासदांची चौकशी करणेबाबत.
२) छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेची चौकशी होणेही गरजचे आहे. त्यामध्ये कर्ज काढलेल्या रक्कमेत आणि त्यावरील व्याजामध्ये मोठया प्रमाणात तफावत आढळून येणार आहे. तसेच रेग्युलर कर्जदारांना कर्ज माफीचा लाभ देण्यात आला आहे. काही खातेदारांची कर्ज माफी झाली असताना त्यांची थकबाकीदार म्हणून ठेवण्यात आले आहे. उदा. १. आत्माराम शिवाजी सायकर, २. जगन्नाथ भानुदास सुळ, ३. दादा/रामदास बापू
सायकर व इतरांची चौकशी करण्यात यावी, तसेच काही सभासदांचे कर्ज माफी मध्ये नावे असतानाही त्यांची कर्ज भरुन घेतले आहेत. तसेच संख्येचे सचिव च सहायक सचिव यांनी १३० लोकांकडून कर्ज माफी लेट आली म्हणून सभासदांकडून ५००० रुपये घेतले आहेत. त्याची चौकशी व्हावी,
३) महात्मा फुले कर्ज माफी योजनेमध्ये संस्थेचा सभासद नसतानाही काहींची नावे कर्ज माफी मध्ये आली आहेत, तसेच सभासदांनी कर्ज काढले नसतानाही त्यांची नावे कर्जत माफी मध्ये आली आहेत. काही सभासदांच्या कर्ज व त्यावरील व्याजामध्ये मोठया प्रमाणात तफावत दिसून येत आहे. काही सभासदांची नावे महात्मा फुले योजना व छत्रपती कर्जत माफी योजना या दोघांमध्ये दिसून येत आहेत याची चौकशी होणेबाबत.
४) ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक यामध्ये सन २०१६ ते २०२३ या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्यामध्ये दरवर्षी तसेच कोरोना काळात संस्था बंद असताना नवीन संगणक घेणे, नवीन सॉफटवेअर पेणे, खेड सोसायटीला पैसे देणे, या व इतर बार्बीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तसेचं वरील गोष्टी खरेदी न करता लेखा परिक्षण अहवालात दाखवुन भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
५) वार्षिक सभेमध्ये असे ठरले की नवीन सभासदांसाठी २०० रुपये फी भरून सभासद करण्यात येईल. त्याप्रमाणे ४५ सभासदांची २०० रुपये प्रत्येकी व इतर कागदपत्रे संस्थेचे सचिव यांच्याकडे जमा केली आहे. परंतु वर्ष होऊन देखील त्यांना सभासद पावती देण्यात आली नाही, त्यामुळे ते कर्जापासुन वंचित राहिलेले आहेत.
६) वरील सर्व माहिती मी माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती अधिकारातून उपलब्ध करुन घेतली आहे. त्याबाबत आपण मागणी केल्यास आपणास सदरील माहिती भी पुरावा म्हणून देण्यास तयार आहे. तरी वरील सर्व बाबींचा नोंद घेऊन सदरील आखोणी वि.का.से.सो. संस्था लि. आखोणी, ता. कर्जत यांच्याकडून वरील बाबींचा खुलासा घेऊन
दोषीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. यासाठी
हनुमंत लक्ष्मण सुळ व इतर नवीन ४५ सभासद व चालु सभासद सहाय्यक निबंध कर्जत येथील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.